भविष्यातला गणेशोत्सव – एक दुस्वप्न – श्री सुधीर एरंडे
भविष्यातला गणेशोत्सव
एक दुस्वप्न
स्क्रीनवरती अक्षता अन लिंकवरती च आरती,
सांग बाप्पा माणसांची कुठवर गेली प्रगती?
माणसांच्या गर्दी मधला जिवंत मेळा संपला,
व्हर्च्युअल’ जगात आता देवही गोळा झाला!
झोमेटो नी जरी आला घरी आज मोदकांचा प्रसाद,
पंगतीतल्या आनंदाचा हरवला तो आस्वाद.
लाईक्स आणि व्ह्यूजमध्ये उत्सव हा मोजतात,
इमोजीच्या अश्रूंनी मग निरोप बाप्पाला देतात.
कुठे हरवला ढोल-ताशा, कुठे हरवला गुलाल?
टेक्नॉलॉजी ने केला भावनांचा हा बेहाल!
स्पर्धा झाल्या आँनलाईन, रंगमंच रिता झाला,
दहा दिवसांचा तो जल्लोष लाईव्ह विडिओत सामावला.
नको रे देवा रडवू असे दुस्वप्न दाखवून,
मनातल्या त्या भक्तीचा ओलावा राहू दे न टिकवून!
गणपती बाप्पा मोरया च्या गर्जनेत वाजू दे गाजा बाजा,
काचेच्या चौकटी बाहेरच शोभतो आपला विघ्नहर्ता राजा!
सुधीर एरंडे 🙂 🙏
