पूर्वांचलाची मांदियाळी – श्री सुहास देशपांडे

पूर्वांचलाची मांदियाळी

 

जुलै महिना सुरू होताच वेध लागतात बाप्पाच्या आगमनाचे. सगळी मरगळ झटकून सगळेच *शहाणे* एकत्र यावेत म्हणून *साठे* भेटीच्या तारखा ठरवतात. लगबग सुरू होते. सगळ्यांना आवताण धाडलं जातं.

*महाजनी* की *जोशी* दोघांकडे पौरोहित्यासाठी विचारपूस होते.

जमा खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी *परांजपे* आणि *टिकेकर* तत्पर असतात.

आरास म्हणजेच *बोरवणकर* समीकरण पक्क झालंय.

*ढमढेरे* आणि *एरंडे* रोज सगळा आढावा घेतात.

*चित्रे* सगळी सुत्र सांभाळून असतात.

*मोहरीर, भालेराव* प्रायोजकांच्या शोधात असतात.

*यन्नंवार* सर्वदूर लक्ष ठेवून असतात.

*पाटणकरांची* बोटे सफाईदार पणे तबल्यावर फिरताना सगळ्यांची मने जिंकतात तर *नाशिककर* मनावर राज्य करतात.

*पुराणिकांच्या* शाब्दिक मेजवानीची सगळ्यांना आस असते आणि त्यांच्याच नजरेने दिल्ली बघण्याची सगळ्यांना हौस असते.

*करजगीर* आहारावर लक्ष ठेवून असतात.

गोड गळ्याने *गोडबोले* गायला येतात तर *वैद्य* संस्कृतीला वाहून घेतात.

*दिवटे* घेतात चित्रकलेचा आढावा

तर आरोग्यम धनसंपदा *निंबाळकर* सांगतात.

विसर्जनाचा खणखणीत आवाज *जुमड्यांचा* असतो. तर *बोकील* जोडी शुद्ध मराठीत गितेचे पाठ देतात.

*करंजगावकरांवीना* मंडळ अजूनही नाटक शोधतयं तर *भटांचे* शास्त्रीय संगिता ने सगळ्यांनाच खिळवलंय.

*मटांगे* भक्कम वारसा पुढे चालवत आहेत.

*वेसनेकरांची* उपस्थिती उत्साहीत करते तर *मरखेडखरांचे* हास्य मन प्रफुल्लित करते.

*फणसेही* हळूहळू रुळत आहेत तर *कुलकर्ण्याच्या* मुलांचा आवाज मंत्रमुग्ध करतो आहे.

*कृष्णन* यांच्या आवाजाला सगळ्यांचीच दाद आहे.

*खांडेकर* आणि *वैशंपायन* सगळी खबर ठेवतात *वाघांच्या* कलेचा आजही बोलबाला आहे.

*बोबडे* बोल मात्र आता महाग झाले आहेत त्यात *देशपांडे* अर्ध्या गोष्टीचा व्याप वाढवत आहेत.

*खिरवडकरां* साठी आजही डोळ्यात पाणी आहे.

*राव,कालकर, बेडेकर, गांवकर, रत्नपारखी, शेलार, पुरोहित, सोलापुरकर, मोघे* सर्व भाविकांचे *लोंढे* रोज येत आहेत. नवीन लोकांचे रोज सहर्ष स्वागत होत आहे आणि राम मंदिराचा प्रांगणात पाचही दिवस *गणपती बाप्पा मोरया* चा आवाज बुलंद होतो आहे. पंगतीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला जातो. पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या बोलीवरच बाप्पाला निरोप देतो आणि…….

 

*सावळकर, ताम्हणकर, रास्ते, गोगटे , गुर्लहोसूर, सोमनाथे, पगारे* प्रत्येकाची दिल्लीत कमी आहे पण प्रत्येकाला बाप्पाच्या वरदहस्ताची हमी आहे.

 

*गणपती बाप्पा मोरया*

 

*सुहास देशपांडे*