गणेशोत्सव – श्री सुधीर एरंडे

गणेशोत्सव

येत नाही उत्सवात आता लहान पोरं,
कुठे हरवली आपली ‘जेन-जी’,
म्हणूनच आहे आपल्या सगळ्यांवर गणपती बाप्पाची मोठ्ठी नाराजी!
पूर्वी पाच दिवस मुले करायची भारी धमाल,
नाच-गाण्यांनी स्टेजवर व्हायची खुपच कमाल!
रंगवायचे एकत्र छान रांगोळी अन् चित्र,
मंडपाच्या अंगणात जूळायचे नवे मित्र!
भक्ती भावे लहान मोठे करायचे श्रीं ची सेवा,
त्या सोनेरी दिवसांचा मात्र आज वाटतोय हेवा!
रोज आरतीला उरलेत आता फक्त आजोबा अन् आजी,
म्हणूनच आहे आपल्या सगळ्यांवर बाप्पा ची मोठ्ठी नाराजी!
यंदा तरी कामांचे व्याप थोडे विसरा,
पाच दिवस एकत्र येऊन गणरायाला स्मरा!
सगळे जण मिळून करू उत्साहाने तयारी,
सर्व कार्यक्रमांना लावू भक्तांची हाजिरी!
स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिंकू बक्षिसे छान,
उत्सव हा गाजवून वाढवू ‌माय मराठी ची शान!
पुन्हा एकदा करूया गत वैभव ते ताजे,
आनंदाने वाजू द्या भक्तीचे गाजे बाजे!
एकजुट होईल जेंव्हा पूर्वांचल परिवार सारा,
दूर होईल नाराजी अन् लाभेल श्री गणेशाची कृपा-धारा!

 

सुधीर एरंडे 🙂🙏