दिवा स्वप्न – प्रेम रंग – बोबडे बोल – श्री संदीप बोबडे

*|| दिवा स्वप्न – प्रेम रंग ||*

दिवसा उजेडी पण तुझा चेहरा वाचला नाही,
कसे ना हे अजब प्रेम, तू जवळ असूनही भाव समजला नाही…

मी रोज शोधत राहिलो तुझ्या नजरेतला अर्थ,
माझ्याच मनाचा कधी, मला ठाव लागला नाही…

कितीदा तुला सांगायची होती, मनातली सारी आस,
प्रेम माझे खरे होते, म्हणून शब्दच फुटला नाही…

तुझ्या एका हास्यावर, सारे जग मी पाहिले होते,
पण त्या हास्यामागचा अर्थ, कधी समजू मी शकलो नाही…

हेच ते प्रेम होते आपले, की फक्त एक भास होता,
कळलेच नाही मला, आणि तू ही समजावला नाही…

दिवसा उजेडी पण तुझा चेहरा वाचला नाही,
कसे ना हे अजब प्रेम, तू जवळ असूनही भाव समजला नाही…

*|| बोबडे बोल ||*

*संदीप बोबडे*
8600044254