भावना कुणा कळत नाही – बोबडे बोल – श्री संदीप बोबडे
*|| बोबडे बोल ||*
*|| भावना कुणा कळत नाही ||*
प्रेम, कधी झुकत नाही, मन काही ऐकत नाही,
जिथे लागतो जीव माझा, प्रेम तिथे मिळत नाही…
हृदय देऊन बसलो ज्याला, त्याला याची जाण नाही,
डोळ्यांत माझ्या स्वप्नांचे, त्याच्या डोळ्यांत काही नाही…
वाट पाहता पाहता माझी, रात्र कधी सरत नाही,
तो येईल या आशेवरती, पापणी माझी मिटत नाही…
शब्द ओठांवर येतात किती, पण ओठ काही बोलत नाही,
मनात दडले प्रेम तरीही, त्याला कधी कळत नाही…
जपले ज्याला जीवापाड मी, तो माझा होत नाही,
नशिबाच्या या खेळामधले, कोडे काही सुटत नाही…
प्रेमामध्ये हार मानणे, मनाला कधी पटत नाही,
ज्याच्यावरती जीव जडतो, त्याच्याविना मन रमत नाही…
जवळ असूनही कधी, दूर दूर वाटतं कुणी,
हृदयातलं सांगावं म्हटलं, शब्द काही फुटत नाही…
प्रेम माझं खरं होतं, एवढंच समाधान आहे,
मिळालं नाही म्हणून प्रेम, कधीच कमी होत नाही…
प्रेम, कधी झुकत नाही, मन काही ऐकत नाही,
जिथे लागतो जीव माझा, प्रेम तिथे मिळत नाही…
*|| बोबडे बोल ||*
*संदीप बोबडे*
