समाधान – बोबडे बोल – श्री संदीप बोबडे
*|| समाधान ||*
शोधता शोधता रोज
शोधत बसलो समाधान
हळूच हलके हरवत होतों
कासाविस होतसे प्राण
हरवलेल्या त्या क्षणांना
मन पुन्हा शोधीत राहिले
उमलणाऱ्या प्रत्येक स्वप्नांना
विरहाचे रंग लागले
कधी वाटे मिळेल किनारा
कधी वाढत गेले अंतर
स्वतःलाच शोधता शोधता
हरवून गेलो मी निरंतर
शोध संपता जाणवले
उत्तर होते माझ्याच ठायी
ज्याला शोधत फिरलो जगभर
ते समाधान होते मनामध्येच काही…
*|| बोबडे बोल ||*
