॥रूसावे पुन्हा हसावे ॥ – ॥ बोबडे बोल ॥ – श्री संदीप बोबडे

*॥ बोबडे बोल ॥*©

 

*॥रूसावे पुन्हा हसावे ॥*

 

श्वासा गणीक स्मरावे… ज्यांना

त्यांनीच असे रूसावे…

हाय मी ही खाल्ली रेss आता…

मज जखमे जुन्याचं दुखावे

 

आठवून क्षण ते मोठे

मनी अंतरी मी सुखावे….

मनांतील कप्प्यात ….ज्यांना

डोळे ओलावूनी बघावे…

त्यांनीच असे रूसावे…

धुसफुसूनी अबोल असावे

गाल फुगवून कुणी बसावे….

 

राहूनी ही जवळपास,

कुणी जाणून नजरे लपावे….

मोकळ्या बोलचालीत..

कां ते, ओढून तोकडे बोलावे;

गाल फुगवून कुणी बसावे

त्यांनीच असे रूसावे…

ओढून तोकडे बोलावे;

बघुन पदर आसवांचे – डोळी

अवसान ते गळावे……

कळी खुलूनी पुन्हा हसावे

कळी खुलूनी पुन्हा हसावे

 

*॥ बोबडे बोल ॥*©

 

*थोडा गज़ल प्रकार*

 

*©संदीप बोबडे*