|| निंदक आणि वंदक ||
गरज पडते तेव्हाच
ते तोंड वर करून येतात…
सल्ले द्यायची वेळ आली की,
टाळ वाजवण्याची आठवण देतात…
नकोत असे सोबती,
ओठात एक अन पोटात एक…
सदैव नाक मुरडलेले…
कुणाही सोबत ती नसती नेक…
दुसऱ्यांचे दोष मोजताना,
स्वतःचे दोष लपवितात…
मुखवटे घेऊन माणुसकीचे,
स्वार्थापुरतेच नाते जपतात…
निंदाकाचे घरं आसवे शेजारी
पण आपण त्याचा भार घ्यायचा नाही
वंदक – कितीही दूर चा असेल तरिही
साथ त्याचा सोडायचा नाही….
आम्ही तेंव्हाही एकटे होतों
पण, मदतीचा हाथ सोडला नाही
आता माणसं ओळखता….,
दुरूनही हाथ – जोडल्या जात नाही…
दुरूनही हाथ – जोडल्या जात नाही…
अशा खोट्या सोबतींपेक्षा,
एकटे पणात – बरं वाटतं ..
खरेपणाने साथ देणारं
आयुष्यभर मनात राहतं …
॥ बोबडे बोल ॥©
