पहिला पाऊस
गच्चीवर पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. पाणी पाईपावाटे ड्रेनेजमध्ये जाउ लागले. सोसायटीत सर्वदूर झालेल्या काॅक्रीटीकरणाने पाय पसरलेले आहेत. पहिला पाऊस पडतोय आणि ज्याची वर्षभर वाट बघीतली तो हवाहवासा मातीचा सुगंध दरवळलाच नाही. आणि लक्षात आलं, हे काही आपल्याला सोसणारं नाही. बाल्कनीतून खाली बघीतलं तर गुडघाभर पाणी लगेच साचलं पण त्या पाण्याला जमीनीत जायचं असतं हे आपले काॅंट्रॅक्टर विसरले वाटतं. त्यांचं ठिक आहे हो त्यांना कुठे इथं रहायचं आहे पण आपल्याला तर इथंच रहायचं आहे आपल्या मुलाबाळांना इथंच लहानाचं मोठं व्हायचं आहे मग आपण का आपली अक्कल गहाण टाकून दारात माती न दिसणारी घर घ्यायच्या मागे लागतोय.
बघा बुवा परत एकदा विचार करा.
घ्यायचाय ना तो पहिल्या पावसात दरवळणारा मातीचा सुगंध भरभरून…..
सुहास देशपांडे
