।। धरमपेठ काँफी हाऊस ।। – संदीप बोबडे

।। बोबडे बोल ।।©

।। धरमपेठ काँफी हाऊस ।।

तेच सोनेरी दिवस…..
पुन्हा नाही दिसायचे..
आठवणीत आपल्या
कधीतरी डोकवायचे..
तिथेच घडलो
तासनतास पडलो
हसलो रडलो
गळ्यात भिडलो
एकाच कांडीत … पेटायचे
तेच सोनेरी दिवस…..
पुन्हा नाही दिसायचे..।। ।।
कधी दोसा साधा
कधी इडली – सांबार वडा
आठवले जरी आज
ओलावतात डोळ्यात कडा
कडकडून रोज सखे भेटायचे
तेच सोनेरी दिवस…..
पुन्हा नाही दिसायचे

।। बोबडे बोल ।।©

@संदीप बोबडे