॥ माऊली ॥ – संदीप बोबडे

॥ बोबडे बोल ॥©

॥ माऊली ॥

ज्ञानियाचा राजा मझा
माय माऊली बोलतो
रामदासी कार्य चाले
शिवबा मुग्ध ऐकतो……..
 

शिवबा मुग्ध ऐकतो
पुढे तो ची “तो” पेटतो
सर्वां सोबती घेवून
छत्र आपुले राखतो…..
 

छत्र आपुले राखतो
काळ पाऊले मापतो
हिच आमची माऊली
सदा आमची सावली……
 

माय मराठी माऊली
असे आमची सावली
सदा पल्लव पालवी
माय मराठी माऊली

माय मराठी माऊली
सदा आमची सावली
माय मराठी माऊली
माय मराठी माऊली ॥ ॥

 

॥एक अष्टाक्षर॥

 

॥ बोबडे बोल ॥©

 

संदीप बोबडे