|| एकच ध्यास ||
कां हारलो म्हणू, स्वतःशी
जेंव्हा, प्रयत्न सुरूच आहे…..
प्रतिसाद येईलच – हवा “तो”
ठाम विश्वास मनास आहे……
बघत होतें सारे
एकटाच प्रयत्नी होतों…
मार्गी किर्रर्र अंधाऱ्या
एकलाच जात होतों
कुणी सोबतीला नव्हते…..
बघणारे गर्दीत होतें….
गवसले खूप काही
तेंव्हा पाठीला खेटून होते…..
वळून बघण्याची त्यांना
मला गरज भासत नाही
एकट्याने सवय लढण्याची
गर्दीत ती दर्दी नाही…..
प्रयत्न अजून उडण्याचे
मनांत पेटून आहे….
प्रतिसाद येईलच – हवा “तो”
ठाम विश्वास मनास आहे……!!
॥ बोबडे बोल ॥©
