मैत्र आणि मैत्री – संदीप बोबडे

*।। बोबडे बोल ।।*©

 

*।।मैत्र आणि मैत्री।।*

 

मैत्री च कधीच नातं नसतं

मैत्री ची आपली एक नाळ असते…

सम विचारी – विरोधी ना जुमानता

ती मना आतुन जुळते…..

 

मग कुठले साखळदंड

तिला दुर सारु शकत नाही..

कितीही दुरवर राहोत नंतर

कुणी तीला मारू शकत नाही

 

व्यक्ती चा अंत होतो

पण मैत्री ही मैत्री असते…

जाणकारांना ती तत्काळ दिसते

मैत्रां नी नेहमी अनुभवायची असते

 

*।। बोबडे बोल ।।*©

 

*@संदीप बोबडे*