नाही तो हावभाव, आहे फक्त निर्मल भाव,
नाही कसलाच बडजाव, आहे फक्त मीत स्वभाव…
निघलास आज तू एका नव्या वाटेवर,
आठवणींचा भार ठेवून माझ्या मनावर.
असा मित्र मिळणे ही तर नशिबाची साथ,
ज्याने संकटातही कधी सोडला नाही हात.
अंतर वाढेल आज आपल्या दोन्ही शहरांत,
पण जागा तुझी तीच राहील माझ्या हृदयात.
पंख पसरून गाठ आता आयुष्याचे नवे शिखर,
आलोच कधी साद द्यायला, तर मागे वळून बघ जराभर!
नाही तो हावभाव, आहे फक्त निर्मल भाव,
नाही कसलाच बडजाव, आहे फक्त मीत स्वभाव…
चालत राहा अशीच तुझी ही साधी सुंदर वाट,
मैत्री आपली कायम राहील, जपून ठेवू ही रेशीमगाठ!!
श्री प्रविण यन्नावार रचित
श्री सुहास, सौ शुभांगी, संकेत, पूर्वा, ममता आणि देशपांडे परिवार ह्यांच्या निरोप प्रसंगा साठी प्रस्तुति
