पूर्वांचल चे ऋणानुबंध – श्री सुधीर एरंडे

आज (६ ऑगस्ट २०२६) दिल्ली सोडून पूर्वांचल चा कशाचा गवगवा न करता सतत समाजा चे काम निस्वार्थ करणारा चांगला कार्यकर्ता (श्री सुहास देशपांडे व कुटुंब) दिल्ली सोडून पूण्याला स्थायिक होण्यासाठी निघत आहे, ह्या वेळी काही भाव जे मनात आले ते कवितेच्या माध्यमातून प्रस्तुत आहेत.

पूर्वांचल चे ऋणानुबंध

आधी पगारे, मग नाशिककर, देशपांडे
पाठोपाठ निघाले,
मोहरीर अन् वैद्य साहेबांनाही
मायदेशीचे वेध लागले.
स्वप्नांची घेऊन उंच भरारी,
अनोळख्या या जगात आले,
हळूहळू या परक्या भूमीवर
आपले सुंदर घरकुल थाटले.
एकत्र येऊन गुंफली नाती
‘पूर्वांचल’चे रोप लावले,
राजधानीच्या या गजबजाटात
स्व-संस्कृतीला जपत नेले.
आपसातल्या स्नेहबंधांनी
मैत्रीचे हे नाते घट्ट झाले,
भावी पिढीच्या डोळ्यांसमोर
आदर्शांचे दीप उजळले.
सायंकाळी विसाव्यासाठी
पक्षी पुन्हा घरट्याकडे वळाले,
नातवंडांच्या मायेपोटी
आजी-आजोबा घरी परतले.
एकामागून एक सखे-सोबती
आम्हास सोडूनी गावी गेले,
निरोप देता त्या मित्रांना
डोळे आज अश्रूंनी भरून आले.

सुधीर एरंडे 🙏