को जागते? को जागिरे?? – संदीप बोबडे

॥ *बोबडे बोल* ॥

 

॥ *को जागते? को जागिरे??* ॥

 

पूर्ण चंद्राची झालर

अन दुधात साखर

सिमोल्ल॔घन जाहले

आता सुरू सण वार

 

पुढे छान रहायला

लक्ष्मी घरं बघणार्

आज पासून “ती” नवे

स्वच्छ घर शोधणारं

 

घरी येऊ लक्ष्मी माता

पुजूयात कोषागार

स्वच्छ करू सारवून

अडगळ नको फार

आता सुरू सण वार

 

सज्ज झाला परिसर

स्वच्छ झाले घर दारं

प्रकाशली दीप माळ

हर एक घरावर

 

शरदाच्या पुनवेला

अंगणात चुलीवर

चारोळी विलायची चे

दुध घ्या गाडगा भर

फेटू, घालूनी साखर

विसरूनी भेद भाव

चला करूया जागर

 

पूर्ण चंद्राची झालर

अन दुधात साखर

भेद भाव विसरूनी

चला करूया जागर

येते कोजागिरी माता

करू तिचा जयकार

चला करूया जागर

चला करूया जागर

चला करूया जागर

 

॥ *बोबडे बोल* ॥©

 

*एक अष्टाक्षर*

 

@ *संदीप बोबडे*