बोबडे बोल – संदीप बोबडे

॥ बोबडे बोल ॥

शब्द मोजकेच असावेत…
तोलून मापून न भासावेत
जिव्हारी लगेलसे नसावेत
ऐकणाऱ्यास “ते” स्पष्टपणे दिसावेत…!!

मित्र ही मोजकेच असावेत
परक्यांसाठी बावळट जरी भासवेत
मैत्रीत झोकून देणारे असावेत…
दूर जरी असलेत – सोबत मला दिसावेत…!!

शब्दाची आणि मैत्रीची
वेगळीच नाती असतात
वैखुरीच्या प्रगाढ मैत्रीत
परवस्थेतलेच शब्द कळतात..!!

॥ बोबडे बोल ॥©

@ संदीप बोबडे