श्रद्धांजली

श्रद्धांजली

 

६ जानेवारी सकाळी पाच वाजता उज्जैन हून मझ्या मोठ्या बंधून्चा फोन आल्याने मी दचकलो, इतक्या सकाळी आलेला फोने बहुदा काहीतरी दुखद बातमी चा असतो असा आजवर चा अनुभव आहे. आणि तसेच झाले, त्यांनी बृहन महाराष्ट्र च्या ग्रुप वर ‘श्रीकांत” ला देवाज्ञा झाल्या ची वार्ता श्री कुणाल महाजनी यांनी पाठवल्याचे वृत्त मला सांगितले.  मी लगेच त्यांना विचारले ” कोण रे हे  श्रीकांत? ‘

पुढच्या उत्तराने सगळ जग हलवून टाकलं – ” श्रीकांत करंजगावकर “.

त्या पुढे फोन चालू होता कि नाही हे पण माला आठवत नाही. विश्वास बसत नव्हता तरी मी मित्र मंडळीना फोन करून बातमी असत्य असावी हे सिद्ध करण्या च्या मार्गाला लागलो. पण “पूर्वांचल परिवार” च्या व्हाटसेप ग्रुप वर ही बातमी खरी असल्या चा पुरावा मिळाला…. ….  …

श्रीकांत आणि माझी ओळख कधी झाली हे काहीच आठवत नाही,  पण ओळख झाल्या पासून तो माझा  बाल मित्र आहे असेच वाटायचे.  नाटका  ची हौस , संगीता ची आवड, समाज कार्याची ओढ आणि सदैव हसतमुख व्यक्तित्व, या सर्व गुणांन मुळे व ग्वाल्हेर ला माझ्याच कालेजात (६-७ वर्षा नंतर) शिक्षण झालेला असल्याने तो मला बाल सखाच वाटत असे.

श्रीकांत आणी किरण चे वडील ” श्री विश्वास राव करंजगावकर ” हे नाट्य जगातले सुप्रसिद्ध नट होते. लहान पणा पासून ते माझे आदर्श अभिनेते होते. एकदा मला त्यांच्या बरोबर नाटकात काम करण्याची संधी पण मिळाली होती. पण माझ्या परीक्षा आड आल्यामुळे मला मधेच नाटक सोडावे लागले. श्रीकांत बरोबर नाटकात काम करताना मला सारखा त्यांचा भास होत असे. आणि माझा उत्साह वाढत असे.

“मी माझ्या मुलांचा” ह्या नाटकाच्या आमच्या तालिमी चालू होत्या मला वेळ कमी असल्याने मी लहान भूमिकाच पत्करली होती, आणि श्रीकांत कडे लीड रोल होता. एकदा तालिमी तून घरी जात असताना श्रीकांत माझ्या बरोबर होता. गप्पांच्या नादांत मी त्याला सांगत होतो ” यार या नाटकाच्या तालीमीन मुळे गेल्या दोन महिन्यात दिनचर्ये चा असा गोंधळ उडाला आहे कि काय सांगू.  आफिस साहिबाबाद ला घर दिलशाद गार्डन आणि तालीम प्रीत विहार.

तो नेहमी प्रमाणे मंद स्मित मुद्रेतच बसला होता. काहीच बोलला नाही. काही वेळ शांतते नंतर मीच बोलणे सुरु केले. तुला कामाला रोज कुठे जायचे असते ?  नुसतं “गुडगाव” अस म्हणून तो गप्प बसला होता.

माझा मात्र त्रिफळा उडाला होता. डोक्यात गरगरल्या सरख झालं.  “समाज कार्य किंवा आपल्या आवडी पूर्ण करण्यास वेळ मिळत नसतो तो काढायचा असतो”, मी चाट झालो, तो माझ्या पेक्षा पाचपटीने प्रवास करून तालिमी ला येत असे.  माझ्या मनातला त्याच्या बद्दल चा सम्मान द्विगुणीत झाला . मी, शिरीष जोशी, रेजिना पारख, मिलिंद देशपांडे आम्हाला नाटकाची हौस होती, नाटकाची ओढ होती पण श्रीकांत ला नाटकाचं वेड होत . जणू त्याच्या जीवनाचा उद्देश नाटक हाच होता.  असं म्हणतात वेड असल्या शिवाय माणूस थोर होऊच शकत नाही.

नाटकाचा विचार करत असताना नुस्त माझा रोल , माझं नाटक असे नाही, पण नवीन लोकांना पुढे आणून पुढच्या पिढीत आपण कलाकार कसे निर्माण करू शकतो हा ध्यास त्याच्या मनात सदैव असायचा. आणि त्या प्रमाणे नवीन पिढीच्या तरुण मंडळींना घेवून नाटक उभं करण्याचे काम तो शेवट पर्यंत निरंतर करत होता . नाटकच नाही तर कोणालाही कुठल्याही कामासाठी मदत हवी असेल ते करण्या साठी तो लगेच पुढाकार घेवून मदतीस तयार असायचा.

यंदा च्या मंडळा च्या निवडणुकीत ह्या वर्षी ही अध्यक्ष स्थानासाठी कोणी ही नामांकनाचा अर्ज भरला नव्हता. मी गेली सहा वर्षे ही जवाबदारी सांभाळत होतो,  श्रीकांत ने “इतर खूप संस्था मध्ये जवाबदाऱ्या आहेत” म्हणून जमणार नाही असे सांगीतले होते .  माझ्या मते श्रीकांतच ह्या पदा साठी सर्वात उपयुक्त  होता. निवडणूक संपता संपता मी अध्यक्ष या नात्यांनी घोषणाच करून टाकली कि या पुढे श्रीकांत करंजगावकर  हे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील.  टाळ्यांच्या गडगडाटात प्रस्ताव मंजूर ही झाला ज्या अधिकाराने मी त्याचे नाव जाहीर केले तितक्याच आपुलकी ने त्याने माझ्या शब्दांना मान देऊन तो आग्रह स्वीकार केला,    आणि दुसऱ्या क्षणा पासून, त्याच्या स्वभावा ला अनुसरून तो अध्यक्ष पदाच्या कामगिरी साठी संपूर्ण आवेशाने जुंपला.

अभिषेक आणि आराधना दोघांची लग्न कार्य झाल्यावर तो अत्यंत आनंदी होता.  नेहमी म्हणायचा ” ढमढेरे साहेब आता मी माझ्या पारिवारिक जवाबदाऱ्यातून  मुक्त झालो आहे” आता मी दिलखुलास नाटक, दिग्दर्शन सिरियल्स, सिनेमा करून माझी हौस पूर्ण करणार. त्या अनुरूप त्याने काम ही सुरु केले.  नुकताच तो एका सिरीयल मध्ये येऊन गेला आणि आता सिनेमात सुद्धा काम करण्याची संधी त्याने मिळवली होती.

२१ जानेवारी २०१८ आमचा लाडका अभिनेता, आमचा चाहेता दिग्दर्शक, एक उत्कृष्ट गायक, एक मार्ग दर्शक सामाजिक कार्यकर्ता आणि आमच्या मंडळा चे अध्यक्ष यांच्या श्रद्धांजली  सभे साठी तयारी चालू होती मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रशांत साठे आणि सचिव श्री प्रवीर चित्रे यांनी मला कार्यक्रमाचे संचालन करावे अशी विनंती केली . आज माझ्या तोंडातून एकही शब्द उमटणार नव्हता याची मला जाणीव होती . म्हणून मी माझी असमर्थता व्यक्त केली आणि माझे अनन्य मित्र आणि मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री चंद्रकांत पाटणकर याना विनंती केली. माझ्या शब्दांचा मान ठेवून त्यांनी ती मान्य केली, आणि अभूतपूर्व आणि समर्पक पद्धती ने पार पाडली.

वक्त्यांच्या यादीत तरी माझ नाव असावं असा सगळ्यांचा आग्रह होता पण मला ते शक्य नव्हते आज माझ्या डोळ्यातुन फक्त अश्रू वाहणार होते याची खात्री असल्याने मी श्री मरखेडकारां पुढे  असमर्थता व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमात मी मागे बसून डोळे बंद करून श्रीकांत च्या व्यक्तिमत्वाला निहाळत बसलो होतो.  थोड्या फार प्रमाणात सर्वाची हीच अवस्था होती.  भाषणे सुरु झाली, डॉ. आलोक पुराणिक बोलण्यास आले, एक अत्यंत विद्वान एकानोमिस्ट,  व्यवसायाने प्रवक्ता, व्यंगकार, लेखक, कवी, श्रीकांत चे शेजारी,  भाषण हाच त्यांचा व्यासंग, पण ……  ते मात्र श्रीकांत च्या आठवणी ने भारावून गेले, तोंडातून शब्द फुटेना, काय बोलावं काही कळेना. विचारांच्या ओघाला आठवणीचा पीळ बसून मन कोमजून गेले. पाझरलेल्या डोळ्यांच्या वजनानं ओठ उघडलेच नाही. नुसता एक दीर्घ हुंदका देवून ते परत जागेवर येवून बसले. समस्त पूर्वांचल  परिवाराच्या मनाची हीच स्थिती होती.  काही लोकांनी स्वतः चे मन सावरून श्रीकांत च्या जीवनाचे काही प्रसंग, काही गुण उलगडले असावेत, मी मात्र खिन्न मनाने डोळे मिटून श्रीकांत चे चिर स्मरणीय व्यक्तित्व निहाळत बसलो होतो.

 कार्यक्रम कधी संपला हे ही मला समजले नाही.  श्रीकांत च्या चित्रा वर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली देण्या साठी लोकं रांगेत उभे होते. नकळत मी पण उठून त्या रांगेत उभा राहिलो . माझा नंबर आल्यावर मी पण पुढे झालो हात फुलाच्या ताटली कडे गेला आणि नजर श्रीकांत च्या  फोटो कडे गेली . क्षण भर मी सुन्न झालो,  पाया खालून जमीन सरकल्याचा भास झाला …….   ….   तिसरा अंक संपला होता ….  …..    …..

आज वर कुठल्याही नाटकाचा प्रयोग सुरु होण्या आधी, रंग मंच आणि नटराजा च्या पूजे साठी श्रीकांत आवर्जून मला बोलावून घेत असे. मी नाटकात असो किंवा नसो, सभा गृहात जर मी असलो तर तो मला माईक वर घोषणा करून बोलवून घेत असे.  मी आल्यावर माझ्या हातात स्वतः च्या हाताने फुल किंवा माळ देवून, प्रथम मला ती अर्पण करून नारळ फोडण्याचा आग्रह करत असे, आणि मग बाकी पूजेला सुरवात.

आज त्या फोटोकडे पाहताच माझा हात अडकला, बोटे दगड झाली, शरीर निष्प्राण झाल्या सारखे गोरठले.  कधी श्रीकांत फुल उचलून माझ्या हातात देतो मी याचीच वाट पहात अडखळलो ……. निष्ठुर  नियती ने आज दगा केला होता  माझा परम मित्र त्या फोटोत बसून आपल्या निष्पाप, प्रसन्न, सुस्मित नजरेन  नुसतं माझाकडे पहात होता मी दोन्ही हातांची शक्ती लाऊन पाकळी उचलली आणि अर्पण केली … … … ती फोटो पर्यंत पोचली कि नाही, हे ही मला कळले नाही ……..

मित्रा आज फुल वाहण्या करता खरोखर तुझी मदत हवी होती . ती नव्हती म्हणून ती पाकळी पण तुझ्या पर्यंत पोचली नसावी पण माझ्या संवेदना,  माझी श्रद्धांजली तुझ्या पर्यंत पोचली असेलच .

मंडळात तू केलेल्या समाज कार्या साठी पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ सदैव तुझे ऋणी राहील.

समस्त करंजगावकर परिवारास आणि आम्हा संपूर्ण पूर्वांचल परिवारास परमेश्वर हे दुखः सहन करण्याची शक्ति देवो हीच ईश चरणी प्रार्थना.

माझ्या परम मित्राला भाव पूर्ण श्रद्धांजली

आमच्या लाडक्या अभिनेत्याला आदर पूर्वक श्रद्धांजली

अथक परिश्रमी समाज सेवकाला विनम्र श्रद्धांजली

आणि पूर्वांचल महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांस समस्त कार्यकारिणी आणि सभासदां तर्फे मनःपूर्वक आदरांजली.