रंगीत संद्या – रजनी – संदीप बोबडे

।। रंगीत संद्या – रजनी ।।

 

नुकताच लँपटाँप अन आँफीस दोन्ही बंद करून उठतच होतो की माझ्या परम मित्राने श्रीकांत अर्कडी ने मला फोन केला अन गँलरीत जायला सुचवले..

 

नुसते सुचलेच नाही तर लगेच मोठ्या गँलरीतून नजारे फोटोत टिपायला सांगितले..

 

बाहेर येउन श्रीकांत ला मनोमन असंख्य धन्यवाद दीलेत..

 

अहाहा काय निसर्गाने नजारा सादर केला होता..वाह।।

 

अशी रंगसंगती मनसोक्त बघायला खूप भाग्य लागतं..।।

 

तसेही आम्हाला लाँकडाउन मधे हे वेड लागलेच होते.

 

इतर कुठेही न जाता (जायचे रस्ते तसेही बंद होते) रिकामे बसण्यापेक्षा हा संद्याकाळ टिपण्याचा छंद अनोखाच..।।

 

ते असो, पण आज टिपलेले क्षण हे नेहमी करता लक्षात राहतील.

 

निसर्ग आपल्या छटा क्षणा क्षणाला बदलत होता. बदलत म्हणण्या पेक्षा उधळत होता. क्षणात नारंगी, क्षणात जांभळा निळ्याशार ढगांच्या कँनव्हास वर काळे करडे ढग कापसापरी पसरून वेगवेगळ्या रंगांना कोलांट उड्या मारायला लावत होता. दुर डोंगरावरुन ते रंग चमचम मिचकत वचकत लवचीक पणे काळ्या पांढऱ्या ढगात मिसळत होते अन सोबतीला संथ वारे संथपणे हसत होते.

 

कालच होउन गेलेल्या अनंत चतुर्दशी च्या बाप्पांना बहुतेक हलकेच पुन्हा कैलास – स्वर्गावर नेण्यासाठी ची मिरवणूक असावी असे ते स्वर्गीय सौंदर्य आज आमच्या डोक्यावर बहरून पसरले होते…।।

 

ही जर त्यांची मिरवणूक असेल तर हे इंद्रेश कृपा करा अन अशी उधळती मिरवणूक नेहमी काढत चला।।

 

।। बोबडे बोल ।।©

एक गद्य छंद

@संदीप बोबडे