निबंध लेखन स्पर्धा – द्वितीय पुरस्कार विजेते –  श्री चंद्रकांत पाटणकर

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, गणेश उत्सव 2024, निबंध लेखन स्पर्धा

द्वितीय पुरस्कार विजेते –  श्री चंद्रकांत पाटणकर 

आपली मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आपण काय केले पाहिजे

माझा जन्म, बालपण व शिक्षण उत्तर प्रदेश च्या एका लहान शहर “बुलंद शहर” मध्ये झालं. इथे अधिकांश वेळ आमच्या शिवाय कोणताही महाराष्ट्रीयन परिवार नव्हता.त्यावर घरातच गायन शाळा असल्या मुळे जास्तीत जास्त वेळ हिंदी भाषी विध्यार्थीं चा जमाव राहायचा. पण घरी आम्ही एकमेकांशी फक्त मराठीत च बोलत असो.आमच्या घरी प्रत्येक वर्षी गुढी पाडवा व कोजागिरी पर्व उत्साहा ने साजरा केला जात असे.वाढदिवसा ला त्यांच औक्षण केलं जात असे.

सतत हिंदी भाषीं च्या संपर्कात असल्यामुळे आमची मराठी भाषा कमजोर राहिली पण आम्ही आज ही एकमेकांशी मराठीत च बोलतो. एक खरे हे पण आहे की विषय मधे “मराठी संस्कृती” वास्तविकते मधे काय आहे, आम्हाला हेच स्पष्ट नाही. दिल्ली सारख्या शहरात बायकां करता नौवारी या पुरूषां करता शर्ट -पायजमा-टोपी-छतरी कदाचित न व्यावहारिक आहे आणि न अपेक्षित.पण आपल्या कोणत्या पर्व,उत्सव या कार्यक्रमात आपली पारंपरिक वेशभूषा घालणे संभव आहे.कदाचित हे पण आपल्या मोठ्या होत्या पिढी ला आपल्या संस्कृती ची ओळख करवेल.

किती चांगले वाटेल जर आपण आपल्या वाट्स्एप ग्रुप मधे मराठी भाषेला प्रोत्साहित करू.घरी आपसात मराठी मधे च संवाद गाठू.  नात्यां करता पण मराठी संदर्भ च घेऊ.आजकाल वाट्स्एप ग्रुप वर Happy Birthday, Happy marriage anniversary, Congratulations, R.I.P.  सारख्या शब्दांची भरमार असते, आपल्याला च ह्या करिता मराठी परंपरा व संस्कृती चे शब्द व भावना व्यक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. आपण भेटत्या क्षणी Hand Shake करतो व Hello म्हणण्यावर आपल्याला प्रगतिशील मानतो. मराठीत आपल्या भावना व्यक्त करणे म्हणजे मागासलेले नाही.

आज ही काही कुटुंबियांच्या पोरांना वयस्कां समोर वाकून नमस्कार करताना बघणे ह्रदयाला शांतता/आनंद देतो. पोरांच्या अश्या कोणत्याही कृत्यावर त्यांचे भरपूर कौतुक केले तर पोरां मधे आपल्या संस्कृती करिता स्वाभिमान जागृत होईल. जमल्यास आपल्या सर्व मराठी मेळाव्या मधे एक सदस्य महाराष्ट्रा च्या कोणत्याही क्षेत्रा ची संस्कृती -परंपरा च्या संदर्भात काही विचार मांडे, त्या क्षेत्रा चे वैशिष्ट्य सांगे.

माझे एक मत हे पण आहे की मंडळाच्या गणपति उत्सव चा एक दिवस आपल्या अविवाहित पोरां करता ठेवला जावो. त्यांच्यात असलेली/लपलेली प्रतिभा सामोरी येईल आणि ते मराठी संस्कृती व परंपरा ने पण समृद्ध होतील. पालक व मंडळाचे प्रभावशाली सदस्यां चा पोरांना आग्रह होण्याने ते उत्सवात भाग घेण्यास अवश्य तयार होतील.त्यांना आपल्या प्रतिभेनुसार विषय मांडण्यास परवानगी असावी.ह्या कार्यक्रमा करता त्यांना मराठी भाषा व पोशाख चा आग्रह करता येईल.

आपल्या गणपती उत्सवात बऱ्याच वेळी पोरांचा फैंसी ड्रेस शो पण असतो. माझ्या आठवणीत नाही की कोणत्या पालका ने आपल्या पोरा ला विठ्ठल, शिवाजी, संभाजी,पेशवा, स्वामी रामदास, एकनाथ, ज्ञानेश्वर चे रूप दिले असावे.कोणी जीजाबाई, अहिल्याबाई,तारा राणी, मुक्ताबाई, बहिणाबाई, सावित्री फुले, आनंदी बाई बनली असेल.झांसी ची वीरांगना रानी लक्ष्मीबाई महाराष्ट्रीयन होती हे तरी आजच्या तरुण पिढीला माहित आहे काय?
सन 1674 मध्ये महाराज शिवाजी पहिले छत्रपती मराठा राजा बनले.

त्यांनी हिंदवी स्वराज करता आपले संपूर्ण जीवन दिले अशी म्हण आहे. खरं म्हणजे तर आपण सर्व हिंदू आहोत.  हो …… प्रत्येक प्रांत आणि त्या क्षेत्राची आपली विशेषता व परंपरा आहे…. आपली बोली आहे आणि हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. जेवणापूर्वी “वदनी कवळ घेता….”  मंत्र बोलणं, कुठे बाहेर जाताना येतो असेच म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे.

उत्तर भारत मध्ये मुली आपल्या माहेरी वाकून नमस्कार नाही करत पण सासरी पाय दाबून- दाबून नमस्कार करतात. आपल्या संस्कृतीमध्ये सर्व आपल्याहून मोठ्यांना वाकून नमस्कार करतात. उत्तर भारतात दर्शन करताना देवाच्या मूर्तीच्या पायांना शिवून नमस्कार करतात. देव आणि दर्शणार्थी च्या मध्ये परदा लावून नैवेद्य दाखवतात. मूर्तीच्या तोंडात प्रसाद भरवतात, महाराष्ट्रा मध्ये मूर्तीला हात पण नाही लावत, देवाला दुरूनच नमस्कार करतात. ॐ प्राणाय स्वाहा……मंत्र द्वारा देवाला नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्राचे काही पदार्थ जसे मोदक, चकली, पुरणपोळी, श्रीखंड आणि आता मिसळपाव, वडापाव महाराष्ट्राच्या परंपरा आणि संस्कृतीला समृद्ध करतात. आपल्याला या खानपान आणि संस्कृतीला बळ द्यावेच लागेल.

काही ही असो सुरुवात आपल्या पासूनच करावी लागेल. मराठी संस्कृतीच्या संदर्भात आपण मर्यादा मध्ये राहू तर आपल्या येणाऱ्या पिढीवर त्याचा प्रभाव अवश्य दिसेल.

चंद्रकांत पाटणकर