निबंध लेखन स्पर्धा – तृतीय पुरस्कार विजेती – सौ मनिषा मोहरीर

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, गणेश उत्सव 2024, निबंध लेखन स्पर्धा

तृतीय-पुरस्कार विजेती –  सौ मनिषा मोहरीर 

आपली संस्कृती.. संस्कृती म्हणजे काय?

ज्याचा आजकाल खूप बोलबाला आहे. खूप त्याच्यावर चर्चा करतात.पण खर तर संस्कृती म्हणजे काय तर… आपल्या पूर्वपार चालत आलेले आपले सण आणि परंपरा. आपल्या पूर्वजांनी खूप मेहनतीने जपून ठेवलेल्या रूढी,सण, व्रत वैकल्ये, कार्य हीच आपली संस्कृती आहे.

आजकाल संस्कृतीच्या नावाखाली जो बदलाव झाला आहे तो बघून खरच अस वाटत की ही आपली संस्कृती आहे का?

आपल्या सोयीनुसार जे सण आजकाल साजरे होतात ती आपली संस्कृती नाही आहे.

सण म्हंटला की आपल्या डोळयासमोर येतात संक्रांत, चैत्र गौरीचे हळदी कुंकू,श्रावनातला शुक्रवार, दिव्याची अवस, राखी, जन्मा अष्टमी, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, तुळशी विवाह.हे सगळे सण कसे एकापाठोपाठ येतात.प्रत्येकाची साजरी करायची पद्धत कशी ठरलेली आहे.पण आता अस झाल आहे की ज्याला वेळ मिळाला तर साजरे करायचे नाही तर सोडून दयायचे.

आता सगळयांजवळ भरपूर पैसा आला आहे गाडी ,घर सगळ काही आहे त्यामुळे कोणत्याही सणाला लागुन शनिवार, रविवार अश्या लागोपाठ सुटटया आल्या की लगेच सण सोडून बाहेर फिरायला जातात, हाॅटेल मध्ये राहतात, खातात, मनसोक्त खरेदी करतात.हेसगळ करण्या साठी माझा काही विरोध नाही आहे.पण जेव्हा आपणच आपली संस्कृती नाही पाळली तर पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगणार? जर तुम्ही आपल्या मुलांना बाहेर चे जग दाखवता तर आपली संस्कृती,सण सुद्धा त्या मुलांना सांगा.

जसं संक्रांती च्या दिवशी आपल्या नातेवाईकांकडे जावून मोठ्यांकडुन तिळगुळ घेऊन त्यांचे आशिर्वाद घेणे.

मुलींना सांगा की फक्त मैत्रीणींना घेऊन रिल बनवले,माॅल मध्दे जाणे,सतत मोबाईल वर राहुन चॅट करने यातच आनंद नाही आहे तर सगळ्या स्त्रियांना बरोबर घेऊन हळदी कुंकू करने, त्यांना वाण देणे म्हणजेच आजच्या भाषेत गिफ्ट देण, निरनिराळे पदार्थ करून आपल्या पाककृती ला वाव देण यात सुध्दा किती आनंद आणि समाधान मिळत. सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकींचे सुख दुःख वाटुन घेण हाच त्याचा हेतू असतो.

गणपती , दुर्गा उत्सवात निरनिराळ्या स्पर्धा, डिबेट, संगीत, नृत्य, नाटक याच साठी ठेवतात. तेव्हा आपल्या गुणांचा कस लागतो.सगळयाच गोष्टी सगळ्यांना येतात असे नाही.पण या गोष्टीत भाग घेऊन आपण त्या वेळेपुरते तरी आपले बालपण, आपल्या मागे गेलेल्या गोष्टी पुन्हा अनुभवता येईल.

तसेही आता बहुतेकांचे घर म्हणजे फ्लॅट संस्कृति. आजूबाजूला कोण राहत हे सुद्धा माहित नसत. दारा समोर चांगली रांगोळी काढायची म्हंटले तरी विचार करावा लागतो.आणि पुरेशी जागा सुध्दा नसते.पण या उत्सवामुळे यात ठेवलेल्या स्पर्धा मध्ये भाग घेऊन आपल्या गुणांना वाव मिळतो.आणि त्यातही जर आपल्याला बक्षीस मिळाले तर मग असे वाटते की जणू काही स्वर्ग च मिळाला.

म्हणूनच मला असे वाटते आताची जी तरुण मुले आहेत ती प्रगती तर खुप करित आहे पण त्यांच आपल्या संस्कृती कडे थोडे दुर्लक्ष होत आहे.तरी त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. तुम्हीच जर या सगळ्या गोष्टी मनापासून स्विकारल्या आणि अनुभवलात तर पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टीं कळायला लागेल.यासाठीच जसा वेळ मिळेल आणि जेवढं आपल्याला कळत तेवढे तरी आपले सणवार साजरे केले पाहिजे.आपण जन्म दिवस, लग्नाचे वाढदिवस , नवीन वर्ष इ. गोष्टी न चुकता साजरे करतोच ना मग आपली संस्कृती परंपरा टिकवायला येवढे तर केलच पाहिजे.

 

मनिषा मोहरीर