॥ प्रवचन – स्व अभिमाना चे ॥
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशीsss
अन मन विचारांत गुंतायला लागले….
कालचे बुवा
क्रोध
कटूता
असूया
कठोर शब्द
या बद्दल प्रवचन देऊन गेले.
आजकाल संसारात राहून कुणी या वर ताबा मिळविला असेल का??
त्या प्रवचन कर्त्या बुवांनी तरी तो आचरणात आणला असेल काय??
याच विचार गर्तेत पुन्हा बुडालो…
अन मग… थैमान – भवरे – विचार वादळात मोठे मोठे होत होत….काय कुठे गेले ते इथे मांडायचा प्रयत्न….!!
========
मनात काय आणि भांड्यात काय
जास्त झाल्यावर सारं च ऊतू जातं
भांड्यात काय साठवायचं हे जरी आपल्या हातात असतं तरी किती साठवायचं हे सरावानं येत असतं.
तो सराव कधी कधी कुणाला जन्म जातो तरी येत नाही;
अन कोणाकोणाला तो सरावच करावासा वाटत नाही!!
जाऊ द्या म्हणा, इथं तसही कोण तुकाराम
आपण आपलं कर्म करत रहावं
पण स्वाभिमानानच जग पहावं.
आपल्याला ठेच लागते,
तर कोणी हळहळत..
आणि कोणी कुत्सित हसतं
दहा तोंडी दहा विचार;
जग हे असंच चालत असतं!!
आपण आपलं प्रामाणिक
कार्य करत राहावं
आपल्याला लागलेली ठेच
आपल्यालाच सहन करावी लागते
जगाचं काय हो ……..
इथ संवेदनाही,
आज काल – स्वार्थीच जगते!!
कोणी स्पष्ट बोलून
आपले विचार मांडतात .. तर
कुणी, गोड गोड बोलून
काट्याने काटा काढतात!!
आपण जगतात डोळे उघडे ठेवायचे
आणि आंतर्मनाचेच फक्त ऐकायचे.
कुणाचही मन – हे
त्याला धोका देत नसतं
मनाला जग
खरं खरं दिसत असतं
म्हणून मन नेहमी स्वतःचा
स्वाभिमान
जागृत ठेवायचा प्रयत्न करतं
आणि त्यात काहीच गैर नसतं
मनानं मानानं जगायचं ठरवलं तर ते चुकीचं नसतं
बोल चालीत रुसवे-फुगवे
ते – प्रेमानेच पुसावे!
अरे माणसा समाजात तू रडलास
तरी डोळ्यांनी नेहमी हसावे!!
एका हाताची रे बोट
सम समान ती नाही
कोणी उंच कोणी रूंद
डोळा जग एक पाही
ही समानता सर्वांनी सर्वांकरता राखून ठेवायला हवी.
तशीच आपल्या व्यसनांची सावली झाकून ठेवायला हवी.
मोठा झाला म्हणून
पुजा पर्वताची होत नाही
पूज्यच ….असतो तो नेहमी;
त्याला (कुणी) शेंदूर फासत नाही…!!
“आता उपदेशाचंच बघा……”
तुकाराम महाराज सदासर्वदा शांतच राहायचं त्यांची पत्नी त्यांच्याशी रोज कडाकडा भांडायची बोलायची पण तुकारामांनी कधी आपला तोल ढळू दिला नाही
कोणी तुकारामांना विचारायचे की अहो ही तुम्हाला किती किती बोलते तुकारामांनी कधीही अपशब्द वापरला नाही.
उलट, ते म्हणायचे ही माझी सावली आहे मला ती दिसते आणि मला त्यात मी पण दिसतो.
तुम्हाला फक्त ती काळी दिसते!!
आता अशा तुकाराम महाराजांनी जर आपल्याला उपदेश दिला तर तो त्यांचा हक्कच आहे
आता तुकारामाचा आव आणून बोलणारे,
खरोखर गोड खूप बोलतात
पण त्यांचाही बोल ढळतो……
कोणी जास्तीत बोललं… तर,
तोही माणूस हळहळतो कधी तो ही ओरडतो!!
कारण ते टोचण सहन होणार नसते कुठे कुठे स्वतःचा स्वाभिमान आड येतो आणि हेच “ते” असतं जिथं माणूस चिडतो
मग त्या वेळी माणूस आपल्या पठडीतले सारे संस्कार थोडा वेळ का होईना पण खुंटीला ठेवून तो मनात येईल तस बोलतो.
तोच स्व अभिमान असतो…!!
परिस्थिती वेगवेगळी
माप दंड वेग वेगळे….
आपले तेच सोवळे
ऐसे चालत नसतं…..
दुसऱ्या ला हासर ठेवा
थोडं दुःखात डोळे पुसा
मदतीचा हात देतांना
स्वार्थी व्हायच नसतं
जग दहा मदत विसरतं
एक चुक ध्यानी धरतं
संत अपुलेच बोलती…
दिसतं तस नसतं…….!!
आपण सातत्यान चांगलच वागायचं असतं
पण कुणी अंगावर आलं की खांद्यावरून लोळवायचच असतं…!!
आपणच आपल्याला सांभाळायच असतं…
कैसा है ना…. वो कहते है के….
रिश्ते भी वेल्डिंग की तरह है,
खूब जलना पड़ता है – जुड़े रहने के लिए.
पुन्हा ती तंद्री भंग होवू लागली…..अन,
आता ते स्वर अजून स्पष्ट ऐकू येत होते..
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशीsssss
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी…
झाड फुलांनी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडुन….
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषाराssss….