॥ बोबडे बोल ॥©
“मनांतल घर”
मी तुझ्या मनात
अन तु माझ्या मनात…
हे वास्तू प्रमाण।
मी कुठे ही असलो..
तु कुठेही असली
हे बंध – निर्बंध – संबंध प्रमाण
मला काही दुखलं
तर तुला काही खुपतं..
किवा
तुला काही दुखलं
तर मला काही खुपतं..
हे भावना प्रमाण….
तुझी आवड मी सांभाळून घेणे
अन माझी तु
त्या करता आपल्या आवड निवडीला वेळी त्यागणे
या सर्वच परिस्थितींची अदृष्य भिंत व चौकट नकळत सांभाळणे…
म्हणजेच मनात घर करणे होय।
मनातल्या घराला
निर्मळतेचे रंग असतात..
भिंती संवेदनशील – अन,
सज्जे आनंद फुलवणारे असतात
छत…सर्व दु:ख पेलणारे
तर – फरश्या आपुलकी च्या ओलाव्याने सारवलेल्या असतात…
महत्वाचे म्हणजे मनातल्या घराला कवाडेच नसतात…
पण इथे सर्वच मनमोकळे वसतात्।।
कित्येंकांच्या महालाला ही
त्याचा हेवा वाटतो….. बरं
आठवणींच्या हेलकाव्यात
मलाही मिळू देत कित्येंकांच्या मनातं घरं…
मलाही मिळू देत कित्येंकांच्या मनातं घरं…
मलाही मिळू देत कित्येंकांच्या मनातं घरं।।