॥ बोबडे बोल ॥©
॥रूसावे पुन्हा हसावे ॥
श्वासा गणीक स्मरावे… ज्यांना
त्यांनीच असे रूसावे…
हाय मी ही खाल्ली रेss आता…
मज जखमे जुन्याच दुखावे
आठवून क्षण ते मोठे
मनी अंतरी मी सुखावे….
मनांतील कप्प्यात ….ज्यांना
डोळे ओलावूनी बघावे…
त्यांनीच असे रूसावे…
धुसफुसूनी अबोल असावे
गाल फुगवून कुणी बसावे….
राहूनी ही जवळपास,
कुणी जाणून नजरे लपावे….
मोकळ्या बोलचालीत.. अवघे
ओढून तोकडे बोलावे;
गाल फुगवून कुणी बसावे
त्यांनीच असे रूसावे…
ओढून तोकडे बोलावे;
गाल फुगवून कुणी बसावे
त्यांनीच असे रूसावे…
बघुन पदर आसवांचे – डोळी
अवसान त्यांचे गळावे
कळी खुलूनी पुन्हा हसावे
कळी खुलूनी पुन्हा हसावे