॥ *बोबडे बोल* ॥
॥ *भाऊ बीज* ॥
“भाऊ” – केला भावनांचा
“त्याची” हिच तजवीज़
सर्व बहिणी आतुर
आज आहे भाऊबीज ।। ।।
रक्ता मासांच्या गोळ्यांची
नाळ नसोनसी वाहे….
दुर जरी भाऊराया;
बहिणा आधारी पाहे।। ।।
लक्ष लक्ष दीप दारी
मोठा औक्षणांत दिवा…
आज सासरी माहेर….(अन)
माझ्या दारी भाऊ हवा…
देवा करा तजवीज़;
आज आहे भाऊ बीज।। ।।
॥ *बोबडे बोल* ॥©
*एक अष्टाक्षर*
@ *संदीप बोबडे*