॥ बोबडे बोल ॥ ©
वऱ्हाडी ठुमका
आजकाल पोट्टे लइ झामल झामल करथे
येकी कडे लडते आन दुसरी कडे हासथे
येकी कडे लडते आन दुसरी कडे हासथे
साडेमंदी “ह्यो” – रोज रोज लडे
सराव करो नाइ आन वर्गा मंदी मढे
यायचीच बोंब खरी – बाकी पोट्टे खोटे
ह्याचेत्याचे मांगे लपे आन आव आने मोठ्ठे
आपल्या वाल्या वरगामंदी गूमशान ऱ्हाये
दुसऱ्यावरगामंदी भैयताड ढुंकथच जाय…
परथेकच बाबतिथ थ्योच मने सोताला एक नंबर
मंग बाकिचे काय खुंटीले – बांदलेले बंदर??
जस्स परतेक गानं ह्याने भसाडं गांवं
आन ह्याले वाट्टे – परतेकान॔ ह्याचो नांव घ्यावो
लइ पिकोलो डोस्क म्हाय – लइ निंघथाय चमका
माह्या समद्या मित्रांन्नो – अस्सा मारू नका ठुमका
अस्सा मारू नका ठुमका
अस्सा मारू नका ठुमका
अस्सा मारू नका ठुमका