माझं अंतर्मन – माझी चेतन मैत्री!!

॥ बोबडे बोल ॥ ©

माझं अंतर्मन – माझी चेतन मैत्री!!

काल संध्याकाळ चे निरीक्षण..

सहजच आकाशाकडे लक्ष लावून बसलो होतो. सुर्य तांबडा लाल होत हळूहळू छोट्या छटेत लुप्त होत होता…

शिकलेलं पुस्तकी विज्ञान विसरून मन माझ्या मनालाच प्रश्न विचारत होते की हा गेला तर गेला कुठे?? दुपारी तर पांढरा असुन ही कीती दाहक होता अन आता लाल बुंद असुनही किती शितल भासतोय? हे कुठले भौतिकशास्त्र आहे???

विचारांच्या गर्तेत केंव्हा अंधार पसरून गेला काही कळलेच नाही. अचानक तंद्री भंग झाली तेंव्हा लोभस चंद्रकोर मला खुणवत होती.चंद्रकोरीचा पांढरा रंग जरा जास्तच चमचम करत होता व दुधाळ प्रकाश आसमंतात फेकत होता….

अचानक लक्षात आले, की काल पर्यंत चंद्रकोरी जवळ असलेली शुक्राची चांदणी रुसल्यागत दूर दूर का बरे जाते आहे?
काही दिवसांपूर्वी जेव्हा एकत्र होते – किती मोहक वाटत होते आताही ते वेग वेगळे सुंदरच दिसतात काही वाद नाही
पुन्हा मन असे ही म्हणत होतं की असू देत वेड्या ते थोड्या दिवसांनी परत एकत्र येतील
पण मन च ते.. अन ते ही माझेच मन!!
ते कां स्वस्थ बसवतयं???
त्यानं परत विचारांच्या गर्तेत खडा टाकलांच..
अन ते विचारतं झालं…
मग आपली मैत्री, अशीच असते का??
त्यानंच टाकलेल्या या खड्यामुळे तयार झालेल्या भवरा मधे नकळय घुसलो…अन गुरफटलो.
गुरफटतांना पण तीच चंद्रकोर व शुक्राची युती आपसुकच डोळ्या पुढे नाचत होती मग पुन्हा मन बोलतं झालं अन म्हणालं…
ह्यांचं एकत्रीत दिसणंच साऱ्या जगालाच लुभावतं
मग हा दुरावा कां??
आज माझ्या मनानं जणू काही ठरवून ठेवलं होतं की मला पिसं करून सोडायच
कारण परत त्यानंच विचारलेल्या प्रश्नांला त्यानंच उत्तर दिलं अन मग मी अवाक झालो..
ते म्हणालं, अरे वेड्या..
मैत्रीत जवळ असण किंवा जवळ येण गरजेच नसतं ना? कारण मित्र कधीच एकमेकापासुन दुर नसतात.
किती ही रुसले – फुगले तरी खऱ्या मैत्रीची तार कधिच तुटत नसते!!
इथं मी सावरतोय अस जाणवतांच, मन म्हणालं….
“ती तार एव्हढी बारीक कां असते??” मैत्र….दुर दुर कां नेत (ठेवत) असते..??
या ही स्व प्रश्नाला – मनच उत्तर देत व आता तर विषयालाच विषया बाहेर चे फाटे फोडत म्हणालं….
मग कुणी अनाडी – वेडे त्या तारेची किंमत करतात…
कधी सोने
कधी रूपे
कधी कास्य
कधी लोखंड
जसा स्वार्थ तशी किंमत काढतात अन यालाच (MBA) शिकले सवरले इंग्रजीत प्रोफेशनल रिलेशन म्हणतात!!
माझंच मन मला इथंवर आता एखाद्या योगी महात्म्या प्रमाणे गुरू बनून शिकवायला लागलं होतं..
ते म्हणालं..
पण कसे ना….डोळे उघड अन जग बघ रक्ताची “नाळ” असुनही ती तोडावीच लागते
पण मैत्री ची “तार” असुनही “ती” जोडावीच लागते
कधी कधी ती “तार” जुळायला खुप प्रयत्न करावे लागतात – तर कधी यत्ना विना नकळत जुळते
आपण कितीही नाही म्हंटलं तरी मग ती आपल्याच आसवांतून कळते
तोवर मन मानतंच नाही
आता तुम्हीच बघा…..मला हे कोण सांगत होतं??
माझंच अंतर्मन!!
आताशा त्याने मला या विचारांच्या भवऱ्यातून सुखरूप बाहेर काढायला सुरवांत केली होती…!!
अन, बाहेर काढता काढता ते काही अनुभवी शिकवणूक देत होतं. मैत्रीत नेहमी निस्वार्थ व निखळ रहा असंच सुचवत होतं. नाळ तुटल्या नंतर प्रत्येक नातं हे मैत्रीच असते हेच कानाशी गुणगुणत होतं.
तीच निस्सीम – निस्वार्थ – निर्मळ – निखळ आदरयुक्त मैत्री आई – वडील, बहीण – भावंड, सखे सोबती, सहकारी, सहचारी, पिता – पुत्र, नवरा – बायको या नात्यां मधे पालन कर हेच सारखं शिकवत होतं.
याच विचारांत भानावर आल्यावर मला जाणवलं – आकाशातली ती चंद्रकोर व तो शुक्रतारा…. मंदवारा पसरवत मजकडे खट्याळ नजरेने बघत खदखदून हसत होते.
वेड्या – मैत्री करतोस का आमच्याशी हसुन हसुन विचारत होते.
हातात धरलेलं पेन अचानक मला तारेसारखी जाणवू लागली व ती हिरे माणक्यांची टणक तार आकाशी चंद्राला व शुक्राला …क्षणांतच गुंफू लागली!!
आता क्षणात तीथवर कोण गेलं असेल हे तुम्ही जाणलच असेल??
होय तेच ते…. माझं मनं!!
पुन्हा एकदा त्याने आपणहून गुरूपद स्विकारलं व माझ्या परम मित्राचे बोल मला सांगते झाले…
जयंत म्हणतो…
मला वाटतंय हे एक ऊस्फुर्त व आपोआप जुळणार नाते आहे. यात भाषा जात रंग लिंग वय हे काहीच कारण नसतं !!
आताशा मी स्वतःला पुर्ण सावरलं होतं..
माझ्या अंतर्मनाला मी गुरू मानलं होतं
आता चंद्रकोर व शुक्रताऱ्या बरोबर ते ही खदखद हासत होत अन तिघेही जणू सांगत होते…
एव्हढा मोठा झालास पण जा बघ आता जग .. नव्यानं
तुझी कुंडलिनी आता जागृत झाली आहे
तुला मैत्र व मैत्री कळली आहे!!

॥ बोबडे बोल ॥ ©
संदीप बोबडे
भ्रमण ध्वनी – 8600044254