ग्रीन चिकन – प्रविर चित्रे
- 1 किलो चिकन मध्यम पीसेस
- सजुक तूप 4 चमचे
- कांदा बारीक़ चिरलेला 1 1/2 दीड वटी
- 4 टोमेटो
- 7 – 8 मिरच्या
- अदरक, लसुन
- खड़ा मसाला, गरम मसाला
- पालक 100 ग्राम
- 4 – 5 काजु आणि बादाम
- 50 ग्राम खवा
- दही 3 चमचे
- क्रीम 3 चमचे
- हळद, तिखट, मीठ
- खड़ा मसाला थोडा परतून घ्यावा आणि ठंड करुन अदरक लसुन बरोबर वाटून घ्यावे
- मिरच्या टोमेटो एकत्र वाटून घ्यावे
- काजु बादाम पालक एकत्र वाटून पेस्ट बनवावी
एका भांड्यात तूप टाकून गरम झाल्यावर त्यात कांदा परतावा, गुलाबी झाला की। त्यात गरम मसाला अदरक लसुन पेस्ट टाकवि व्यवस्तित परतून त्यात गरम मसाला, हळद, तिखट टाकावे त्यात टोमेटो मिर्ची पेस्ट टाकवि नंतर त्यात चिकन घालून परतावे आणि वाफेवर शिजू द्यावे. वाफ आल्यावर त्यात दही, क्रीम, खवा टाकावा. पालक पेस्ट टाकून शिजू द्यावे
सर्विंग प्लेट मध्ये काढून सर्व करावे