एक ओळीच्या कथा – ऋचा मायी

#एक ओळीच्या कथा-
AdvRucha Mayee.

१)मूल होऊ शकत नाही म्हणून स्त्रीत्वच नाही असे हिणवणाऱ्यांना तिने आज हजारो अनाथ मुलांची जबाबदारी सांभाळून माणूसकी म्हणजे काय हे शिकवलं..

२)वेळ आल्यावर शिकेन म्हणणाऱ्या अनेकांना आज वेळ निघून जात होती हे जाणवलं आहे.

३)आरामात नंतर करू हे काम घाई काय असते एवढी ? म्हणणाऱ्यांना एका क्षणात जग बदलताना पाहून धडकी भरत होती..

४)आमची कधीच भांडणं होत नाहीत,तो मला आणि मी त्याला कधी निवांत भेटतच नाही…

५)बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्यावर आईला नमस्कार केला,ही स्त्री मात्र त्याला पूजनीय होती.

६)समस्त देशाने घरकाम करून पाहिल्यावर गृहिणीचा तोंडी सत्कार करून परत एकदा असं जगणं तिलाच फक्त जमेल हे सर्वानुमते ठरले.
©️ऋचा मायी.
ruchamayee.wordpress.com
आवडल्यास नावासकटच शेअर करावे.
धन्यवाद!