फागुनाची पुनव – बोबडे बोल – संदीप बोबडे

*।। बोबडे बोल ।।©*

*|| फागुनाची पुनव ||*

फागुनाची पुनव

द्वेष जाळन्यासी आली

परिसरात सगळीकडे

पळस फुलोनी आली

 

जाळा म्हणे मत्सर

जाळा म्हणे अहंकार…..

एक व्हारे सगळे

मुखवटे जरी हजार…

प्रेम वसुद्या मनी

हास्य कोमल गाली sss

फागुनाची पुनव

द्वेष जाळन्यासी आली

 

कोण कुठला अहं

एकटा दुकटा राहतो…

द्वेष मत्सराच्या घरात

तैसेचि सभोल वागतो….

ओढा त्यातला बालक

रंगवून रंग…..गाली

फागुनाची पुनव

द्वेष जाळन्यासी आली

 

कणखर अहं लाकडं

गवऱ्या द्वेष मत्सराच्या

ढळूद्या आगीत पवित्र

नकारात्मक धुराच्या……

नंद आनंद पाहून

नवं पालवी हर एक ssडाली

फागुनाची पुनव

द्वेष जाळन्यासी आली

 

एकात्रीकरणाची नांदी

प्रेमाभावाची ओलसर…..

रंगून रंगात साऱ्या

पसरू आपुलकी खेळकर…..

एक होवू सकल जन

रंग – लावूनी भाली…

फागुनाची पुनव

द्वेष जाळन्यासी आली

*।। बोबडे बोल ।।©*

 

*@संदीप बोबडे*

 

*होळीच्या खूप खूप शुभेच्छा*