तो जगासमोर आय लव्ह यू म्हणणारा,
ती चार भिंतीत नजरेला नजर न देणारी..
ती चार भिंतीत नजरेला नजर न देणारी..
तो चंद्र तोडून आणतो म्हणायचा
तिचं मन मोगऱ्याच्या गजऱ्यात रमायचं..
तो सातासमुद्रापल्याडची स्वप्न पाहायचा,
तिला नदीकाठचा एकांत आवडायचा.
त्याला उंच पहाडीची ओढ होती,
तिला समुद्राच्या लाटांचं वेड होतं.
तो बेधडक जगणारा होता,
ती स्वप्नांत रमलेली असायची.
त्याला अश्रूंची चीड होती,
तिचे डोळे पटकन भरून यायचे.
तो स्वच्छंद,मनमोकळा,राकट,
ती भिडस्त,नाजूक मिटलेली कळी..
त्याला आजवर कळलं नाही,
तिलाही पडलेलं कोडंच आहे…
देवानी बांधल्या रेशीमगाठी की,
दोघांना एकमेकांचं वेडच आहे !
©️ ऋचा मायी
ruchamayee.wordpress.com
आवडल्यास नावासकटच शेअर करावी.
धन्यवाद!