पदार्थ- पोटेटो चीझ बॉल
साहित्य- बटाटे 2 किंवा ३
काळी मिरपूड एक ते दीड चमचा छोटा
चिली फ्लेक्स एक ते दीड चमचा छोटा
मिक्स हर्ब्स एक ते दीड चमचा छोटा
साधे बारीक मीठ चवी अनुसार.
कोर्न फ्लोर 2 चमचे
ब्रेड क्रंब 2 चमचे
चीझ क्युब्स सात ते आठ
मैदा दोन चमचे
तळण्या साठी शेंगदाणा तेल
कृती –
प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. नंतर ते सोलून चांगले कुस्करून त्यात मिरपूड, मीठ, कोर्न फ्लोर मिक्स हर्ब्स चिली फेक्स ब्रेड क्रंब, मैदा हे सर्व साहित्य चांगले एकजीव करून मळून घ्यावे. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून त्यात छोटे चीज क्यूब करून भरून घ्यावे. मैद्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करावी. वरील तयार गोळे या पेस्ट मध्ये घोळवून मग ब्रेंड क्रंब मध्ये घोळवून घ्यावे. थोड्या वेळ १० मिनिटे फ्रीज मध्ये ठेवावे नंतर १० मिनिटांनी फ्रीज मधून काढून तापलेल्या तेलात तांबूस रंगावर तळून काढावे. नंतर सॉस किंवा मेयोनीज सह सर्व करावे टूथ पिक लाऊन खाण्यास द्यावे
सौ. प्राची निखिल पेशवे