कहाणी पूर्वांचलाची – श्री सुहास देशपांडे

 

कहाणी पूर्वांचलाची

 

आटपाट नगर होतं

तिथं एक मंडळ होतं

नाव त्याचं पूर्वांचल

सणवार साजरे होतात

कोजागिरीला गाणी म्हणतात

दुग्धपानाचा आस्वाद घेतात

कडाक्याच्या थंडीत

सहलीलाही जातात

हळदीकुंकाला बोलवतात

रक्तदान ही करतात

वर्धापनाच्या पुजेलाही येतात

मग चाहूल लागते

बाप्पाच्या आगमनाची

लगबग सुरू होते

जेवणाची पक्वान्न ठरतात

वेगवेगळी पत्रकं निघतात

स्पर्धां ठरतात

वाजत गाजत बाप्पा येतात

मंत्रोच्चारात स्थानापन्न होतात

किर्तनात होतात दंग

नाटकात बेधुंद

लागते मराठी गाण्यांची आस

मग धरतात

माय मराठीची कास

भरते स्पर्धांची दंगल

आणि महा प्रसादाची चंगळ

बाप्पा आमचा बुध्दीचा देवता

सुख देतो न मागता

निरोप घेतो

लवकर येण्याच्या बोलीवर

साठा उत्तराची कहाणी

पाच दिवसांत होते

सुफळ संपूर्ण

 

सुहास देशपांडे