साहित्य:
बेसन, दही, मिर्ची आणि आल्याचे वाटण, मीठ, हळद, किसलेला ओला नारळ, कोथिंबीर
फोडणी साठी:
तेल, कढी पत्ता, मोहरी, तीळ
विधि:
सर्व प्रथम बेसनात दही व पाणी घालून मिश्रण तयार करावे. त्यात मिर्ची आल्याचे वाटण व मीठ चवी प्रमाणे घालावे व थोडी हळद घालावी. एका कढ़ईत हे सर्व मिश्रण घालून गॅसवर ठेवायचे आणि व्यवस्थित हलवत राहायचे. मिश्रण चांगले घट्ट झाल्यावर ते एका तेल लावलेल्या थाळी वर व्यवस्थित पसरवुन घ्यायचे. थोडे थंड झाल्यावर त्याचे काप करुन त्यावर कोथिंबीर आणि खोबर्याचे मिश्रण घालून रोल करायचे. थोडं तेल गरम करुन फोडणीचे साहित्य घालून ते खांडवी वर घालून नंतर serve करायची.