॥ बोबडे बोल ॥ ©
एक प्रश्न – देवा तुलाच
मर्ज बनकर दवा देना
बस्स – तुझको ही आता है
भला बूरा हो – उसका असर
फिर हमको ही भाता है….
या ओळी लिहित असताना मागे रेडिओ वर अनोखी रात चित्रपटातले मुकेश च्या दर्दी आवाजात ओहरे ताल मीले लागले होते….
लिहीत असलेल्या ओळी अन मागे वाजणारे गाणे यांची सांगड खाली मांडण्याचा एक प्रयत्न देवाला प्रश्न विचारून केला आहे.. बघा कितपत जमलाय तो…..
ओहरे ताल मीले
नदी के जल मे
नदी मिले सागर मे
सागर मिले कौनसे जल मे
कोइ जानेना Sssssss
खरेच कित्ती – किती भावना प्रधान ह्रदय स्पर्शी – सर्व जगाचे दु:ख्ख कळवळून मांडणारे असे हे गाणे आहे.
छोटे छोटे जीव तरूण होतात. तरूण ते पूढे म्हातारे होतात. आणि म्हतारे??? त्यांचे पुढे काय होते कुणी सांगू शकेल काय? ?
सुरज को धरती तरसे
धरती को चंद्रमा
पानी मे सिप जैसी प्यासी हर आतमा
ओ मितवा रे Ssss प्यासी हर आतमा
बुन्द छिपी किस बालल मे
कोई जाने ना … ओहरे ताल मिले….
पुन्हापुन्हा ह्रदय स्पर्शी ओळी
सूर्या साठी पृथ्वी तळमळते अन पृथ्वी साठी चंद्र!!
अश्यातच आकाशातून जो उल्कापात होतो – तो विनाकारणच नाही! सूर्याचा प्रकाश घेतलेला हा तारा ( आपल्या भाषेत – मालिक का नमक खाया है|) – सुर्याचा निरोप घेऊन पृथ्वीवर आलेलाच तो एक दूत असतो. तिकडे सागराला आलेली भरती म्हणजे चंद्राचे पृथ्वीवर व्यक्त केलेले ऊत्कट प्रेम आहे.
पण बिचारी पृथ्वी – ती चातकाच्या मृगाच्या पावसाची आतूरतेने वाट बघत असते. केन्व्हा चातकाचा मृग येतो व केन्व्हा मी माझ्या शिंपलीरूपी डोळ्यात माझी अनमोल आसवे मी बंदीस्त करून ठेवते – असे तिला झाले असते.
म्हणून हे मितवा म्हणजे निसर्ग देवा तु काही कर आणि कुठेही लपलेला तो मृगाचा पाऊस – त्याला लौकरच माझ्याकडे धाड. माझ्यावर कृपा कर…..
अनजाने होठोपर क्यो
पहचाने गीत है
कलतक जो अनजाने थे….
जनमोके मित है
ओ मितवा रे Ssss
कलतक जो अनजाने थे….
जनमोके मित है
क्या होगा कौनसे पल मे
कोइ जानेना. …..
घरोघरी मातीच्या चुली. देवा तुच मला धरतीवर धाडले व येथून बोलावणारा ही तुच….
मी काय करणार काय नाही करणार. .. पाप करेन की पूण्य याची तूला आधीपासूनच माहिती आहे. मग सर्वानाच पूण्य करायला न लावता हा पापाचा घडा तरी कश्यासाठी? ?
जी माझी व्यथा – तीच या भूतलावर येणाऱ्या सर्वाचीच व्यथा. धरतीवर येण्या आधी आम्ही एकमेकांना ओळखत सुद्धा नसू – पण एवढ्याश्या जीवनात किती जन्मोजन्मीचे नाते तु क्षणात बांधून देतोस आणि त्या मागचे कारणही कळू न देता क्षणात तोडतोस देखिल
खरेच सांगना – या मागचा तुझा ऊद्येश तो कोणता?? की आम्हास कंटाळा आल्यावर स्वतःची करमणूक करून घेतो तसे आम्ही तुझ्या करमणुकीचे साधन तर नाही ना??
ऐ देवा – खरेच सांगशील का या प्रश्नाचे उत्तर? ?
*॥ बोबडे बोल ॥*©
*@ संदीप बोबडे*