स्पेशल वात्रटिका मौज,जत्रा आणि मेनका अश्या महान ग्रंथांत येणारा हा काव्यप्रकार!!
साठी बुद्धी नाठी
साठी झाली बुद्धी नाठी
वाकली पाठ अन् हाती काठी
घेतला गुलाब कोणासाठी
आठवेना मग कपाळावर आठी
अंजुम राय की कविता सेठी
थांबले राव आठवण्यासाठी
पण हिच चुक झाली मोठी
बायको आली टेकत लाठी
बरोबर तिच्या कविता सेठी
सवाल हा दोघींच्याही ओठी
सांग हा गुलाब कोणासाठी
तत प प भितीपोटी
राव पळाले आपल्या कोठी
चिडीचुप्प आपल्या खाटी
झोपले राव उपाशीपोटी
😂😂😂😂😂
