बटाटा बेसन टिक्की – सौ माला बोरवणकर

साहित्य:-

  • चार बटाटे 
  • एक कप बेसन
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर

विधी:-

  1. एक कप बेसन मध्ये अर्धा चमचा हळद, तिखट, चवीनुसार अर्धा चमचा मीठ व त्यात चिरून कोथिंबीर मिसळली.
  2. फ्रायपेन मध्ये दोन चमचे तेल घालून, बेसन ला एक कप पाणी घालून नीट मिसळले.
  3. तेल गरम झाल्यावर, त्यात बेसना चा घोळ टाकला व मंद आचेवर सतत चालवत घट्ट होण्या पर्यंत चालवले.
  4. ताटा मध्ये थोडे तेलाचा थेंब लाऊन, त्यात ते पसरून त्यात ते उकडलेले बटाट्या चा कीस मिसळ ला .
    या मिश्रणाला एका ताटात पसरवून दहा मिनिटे फ्रीझर मध्ये ठेवले.
  5. नंतर त्याच्या वड्या करून तेलात तळ्ल्या.