॥ बोबडे बोल ॥©
॥ अंबारीत मराठी ॥
ज्ञानियाने बोली दिली
तुका – रामदासी मंत्र
शिवबाचे सवंगडी
स्वराज्या ठाई एकत्र…. ॥ ॥
रोहिऱ्याला बेल पाने
बारा मावळ्यांचे रक्त…..
हिंदवी साम्राज्य झाले,
झाले राजे अभिषिक्त…. ॥ ॥
वाजे सनई चौघडे
संह्यांद्रीच्या कपारीत
अटके पार भगवा
बाजीने फोडले तख्त…॥ ॥
अशी जगते मराठी
ती झुलते अंबारीत
महाराष्ट्र दिनी गाऊ
गाऊ महाराष्ट्र गीत
गाऊ महाराष्ट्र गीत
अशी जगते मराठी
ती झुलते अंबारीत
गाऊ महाराष्ट्र गीत
वाजे सनई चौघडे
संह्यांद्रीच्या कपारीत
गाऊ महाराष्ट्र गीत
गाऊ महाराष्ट्र गीत
संह्यांद्रीच्या कपारीत
गाऊ महाराष्ट्र गीत…
॥ बोबडे बोल ॥©
॥एक अष्टाक्षर॥
@ संदीप बोबडे