॥निसर्गदत्त ज्ञानी॥

॥ बोबडे बोल ॥©

॥निसर्गदत्त ज्ञानी॥

होत नाही कदर जिथे
कां, पिसाट होऊनी फिरावे
येड्यांची वाहवाही बघत
उगे, विद्वत्तेने कां झुरावे

पुस्तकात दाटलेले
लाटून, ज्ञानी म्हणावे….
इथे, निसर्ग दत्त झाला
त्यातून कुणी शिकावे?
माळ रानी – वनी फिरावेsss
उगे, विद्वत्तेने कां झुरावे…….॥॥

जाणतो – जो, निसर्ग त्याला
भोंदू, जनी म्हणावे
बघता, प्रशस्ती पत्रकांच्या माळा
दंडक, मुजऱ्यास ही झुकावे…
विद्वान ऐसेची कां दिसावे?
त्यातून कुणी शिकावे?
माळ रानी – वनी फिरावेsss
उगे, विद्वत्तेने कां झुरावे…….

पुस्तकात रसायनाला
न जाणताच फुके स्मरावे…..
गणतीत सोडून पाढे
समीकरणांत का शिरावे
पुस्तकीच का उरावे?
त्यातून कुणी शिकावे?
माळ रानी – वनी फिरावेsss
उगे, विद्वत्तेने कां झुरावे……॥॥

एका पावसात – पथ्थराला
पाझर कसे फुटावे??
पांघरून मखमली ला
हिरवेच त्याने दिसावे…..
बाजूस काळ्या माती
गवत तेथे उगावे
त्यातून ही शिकावेsss
अश्या विद्वत्तेने ही उरावे……
माळ रानी – वनी फिरावेsss
बघतो निसर्ग त्याला
विद्वान आम्ही म्हणावे
माळ रानी – वनी फिरावेsss
विद्वान आम्ही म्हणावे
विद्वान आम्ही म्हणावे………॥॥

॥ बोबडे बोल ॥©
एक गज़ल

©संदीप बोबडे

.