॥ बोबडे बोल ॥ ©
॥ जेष्ठाची – मृगतृष्णा ॥
ये रे जेष्ठाच्या महिन्या
आण मृगाचा पाऊस
वेडी आस चातकाची;
तान्हलेली फिटे हौस…..
आण मृगाचा पाऊस
वेडी आस चातकाची;
तान्हलेली फिटे हौस…..
संपे वैशाखाचे रण
आकाशात काळे ढग
उष्णतेने जे बेजार
वाट ओलत्याची बघ
पसरव तो काळोख
विजा चमकुनी खास
काळ्या ढगां संगे यावा
धरित्रीचा मंद वास
घरा घरात राहून
झाली रयत करूण
साऱ्या मनी आनंदाचा
सडा शिंप रे वरूण
आगमनी पुनवेला
सुवासीनी वडा जाई
बुंधा दोरे सुतावुन
सण वारं सुरू होई….
उन्हा तान्हाने धरती
करपून तप्त झाली…
नांगरावे वावराला
वेळ खरिपाची आली
एक दाना तो पेरला
धनाच्या होती झुंडी
पेरी तेच उगवीते
पिंडी पिंडी ते ब्रम्हांडी..
मंद आनंद वाहतो
ओलावल्या राना वना
हिरवळ चहूकडे
असा जेष्ठा चा महिना