‘हा सूर्य, हा प्रकाश…!’ – ऋचा मायी

‘हा सूर्य, हा प्रकाश…!’

“दिवा वगैरे कशाला आई?.. तेल तूप वाचवणं आज जास्त गरजेचं आहे..
गरीब लोकं भुकेने तडफडून मरत आहेत,आपण तेल जाळून दिवाळी साजरी करायची.. ?

त्या मेणबत्त्या पण जप आई,माहित नाही येणाऱ्या काळात काय काय लागेल?सगळं असलं नसलं संपवून नका टाकू श्रद्धेच्या नावावर.. “ श्वेता आईला वैतागून समजावत होती.

इकडे पोटात काही कमी गेलं तर चालेल पण गणपतीसमोर छोटासा का होईना दिवा हवाच.
भाबडी असेना का,श्रद्धा होती आईची..

आईच्या चिंतेवर तोडगा म्हणून बाबांनी सौरउर्जेवर चालणारा सुंदर कंदील आणला.म्हणाले,
“घे जोपर्यंत आकाशात सूर्य तळपत आहे तोपर्यंत अंधार होणार नाही घरात..’हा सूर्य हा प्रकाश’
आणि श्वेता हे मात्र सायन्स बरंका ! “
©️ऋचा मायी.
ruchamayee.wordpress.com
कथा आवडल्यास नावासकट शेअर करावी.
धन्यवाद!
Photo Credits: Shri.Praful Pathak.