*|| WhatsApp राखी ||*
विसरलो आम्ही राखी
विसरलो ती नाती….
काढलीत किती वर्षे अशीच
बिन बाह्यांच्या रिकाम्या हाती…
ते प्रपंचांत अडकले
अन आम्ही जवाबदारीत
कर्तव्याच्या देशी राहून……
सारे विसरून राहिलीत….
पत्राताला मायना मजकूर
तो ही कुठं हरवला…..
नकोस नातं खोटं खोटं प्रेम
मोबाईल न खरा ठराविला…
लहान पणात तो छोटा हात
कसा न राखी ने भरायचा
एक पेन्सिल – एका पेन बरोबर
लाडू – पेढा प्रेमाचा मिळायचा
तो पेन पेन्सिल चा काळ
खरा होता – की – होती अनुभूती
काढलीत किती वर्षे अशीच
बिन बाह्यांच्या रिकाम्या हाती…
तो गोडवा, ते प्रेम…
गेले स्वर्गाच्या वस्ती….
फुकाचा देखावा.. नात्यांचा दिखावा
अन महान झाल्यात साऱ्या हस्थी
विसरलो आम्ही राखी
विसरलो ती नाती….
विसरलो ती नाती….
*|| बोबडे बोल ||*
– संदीप बोबडे…
