*|| रायगडाचा विठ्ठल ||*
मर्दानी मनात ओढ असेल
तर – प्रयत्नांची जोड पाहिजे
जेंव्हा केंव्हाच्या गोष्टी
कारण शोधाण्यास राहि – जे
म्हणून कधी तरी
पायरी गडांची बघावी
शुद्ध अंतःकरणाने
माळ शंभूची जपावी
ओढ धर्माची कुठे
भक्तीत बदलून जाते
पाऊल आपोआप
मना वेगे धावते
भक्तीतली शक्ती,
राजा *”अंतःकरणात”* पाही
जोड *”शिवा नामाची”*
सदा मुखात राही….
धर्मा साठी प्रण
करूयात सकल जन
रोहिऱ्या वर बेल पत्रे
सशास्त्र सारे क्षण…!!
*|| बोबडे बोल ||*
