|| पुढच्या वर्षी लौकर या ||
ते गणेश तत्व
श्रावणा नंतर येते…
शुद्धता वातावरणात…
स्व संगे पसरवून जाते…|| ||
येथूनच शुद्धते ची सुरवात
तोच आद्य जाणावा
श्रावणातील ढवळलेला
भाद्रात आदी म्हणावा!!
ह्यांचे आगमन
सणांची मांदियाळी
लवकरच नवरात्रिंचा दसरा
अन् अमावस्येला दिवाळी ||
शिवाची लीला
तिला महिमा वर्णावे
पार्वतीचा नंदन
त्यास श्री गणेश म्हणावे…||
पुन्हा त्या अंतकरण शुद्धतेची
वाट, आस लावूनी पाहतो
लाडक्या गणपतीस
“बोल बोबडे वाहतो” …
|| बोबडे बोल ||
संदीप बोबडे