पूर्वांचल महाराष्ट्र मंडळाच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त कविता प्रस्तुत आहे. 🙂🙏
आमचा पूर्वांचल परिवार
राजधानी च्या पूर्व दिशेला जणू जाहला महाराष्ट्र साकार हा,
सर्वांना प्रिय आमुचा पूर्वांचल परिवार हा.
अनोळखी प्रदेशात निर्मिले परिचयाचे ठिकाण हे,
परी झाले आज आमचे श्रद्धा स्थान हे,
श्रेष्ठ जनांनी लाविले जे रोप चार दशका पूर्वी पहा,
घेतला आता त्याने विशाल वृक्षाचा आकार हा,
सर्वांना प्रिय आमुचा पूर्वांचल परिवार हा.
वर्ष भर येथे विविध कार्यक्रमांचा थाट असे,
सोबत मराठमोळ्या स्वादिष्ट व्यंजनां चे ताट सजे,
सुख दुःखात सर्वांच्या सहभाग जेथे असतो सदा,
प्रत्येक मराठी कुटुंबाच्या हक्काचा आधार हा,
सर्वांना प्रिय आमुचा पूर्वांचल परिवार हा.
गतिविधिं ची माहिती मिळे मंडळाच्या च्या संकेत स्थळी,
दर रोज गप्पांची मैफिल जमे पूर्वांचल च्या कट्ट्या वरी,
मातृभाषेतील साहित्याची गोडी चाखतो तेथे सर्वदा,
नवीन पिढी वर घडवतो
संस्कृती चे संस्कार हा,
सर्वांना प्रिय आमुचा पूर्वांचल परिवार हा.