स्पर्धा – गोष्ट अर्धी आमची… आणि अर्धी तुमची २०२४

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ

गोष्ट अर्धी आमची… आणि अर्धी तुमची २०२४

नाव                                                                        वय

रणांगणावरचा मी

इतिहासाचे सर अफजलखानाचा वध अत्यंत आवेशाने शिकवत होते. आवेश इतका की अंगावर रोमांच उभे राहिले आणि मी स्वतः वाघ नखं घालून खानाचा कोथळा बाहेर काढला असं वाटायला लागलं. खानाचा वध झाला, महाराज चपळाईने शामियान्यातून बाहेर पडण्यासाठी वळाले तोच…. बापरे घात होता होता वाचला. सगळा वर्ग चडीचुप. जिवाने वार आपल्या अंगावर घेतला आणि महाराज बाहेर पडले. सगळ्या वर्गाचा अडकलेला श्वास बाहेर पडला.

तोफा धडाडल्या. मावळ्यांनी जावळीत खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला.

धडा संपला आणि सरांनी सांगितले माझ्या कडे एक मंत्र आहे तो उच्चारताच तुम्ही मनातल्या कोणत्याही ऐतिहासिक प्रसंगात पाहिजे त्या भुमिकेत रणांगणावर हजर होऊन घडणाऱ्या युध्दात सहभागी होऊ शकाल पुर्ण एक तास….

मी तर कितीतरी वेळा श्रीकृष्णाने सारथ्य केलेल्या रथावर अर्जूनाच्या भुमिकेत जाऊन स्वतः कौरव सेनेचा धुव्वा उडवून आलो आहे. शिवाजी होऊन शाहिस्तेखानाची लाल महालात बोटं छाटून आलोय.
आज पण मी मंत्र उच्चारला आणि ………

(तुम्ही कोणत्या भुमिकेतून रणांगणावर युद्ध कसे लढले. युध्दातील पात्रांबरोरचा तुमचा संवाद सगळं काही सविस्तर अपेक्षित आहे)

पुर्ण करण्यासाठी

१) कॉपी करून पुढे टाईप करा आणि पाठवा.
२) प्रिंट काढून पुढे स्वतःच्या हस्ताक्षरात पुर्ण करुन त्याचा फोटो पाठवा.

किंवा

३) ८ तारखेला अर्धी गोष्ट प्रिंट केलेला पेपर आपल्याला मिळेल त्यावर लगेच पुर्ण करुन देणे.

पुर्ण करुन ८/९/२०२४ पर्यंत पुढील नंबरवर पाठवा

सुहास देशपांडे ९७१७६८५०९०/9717685090