गणेशोत्सव
कैलासी महादेव पार्वती करीतसे गणेशाच्या भू प्रवासाची तैयारी,
तेव्हा मर्त्यलोका चे भ्रमण करूनी तेथे आली देवर्षीं ची स्वारी.
स्वागतासाठी भक्तांच्या उत्साहा बद्दल मातेच्या प्रश्नावर,
नारदांनी घातली एक अशुभ वार्ता त्यांच्या कानावर.
पृथ्वी तळा वर आलाय एक विचित्र महा आजार,
एका जादू च्या डबी ने केलेय सर्वांना बेजार.
लहानांना सुचत नाहीये अभ्यास किंवा खेळ,
मोठ्यांना पण उरला नाहीये आणखी कशा साठी वेळ.
असा टाकलाय त्या यंत्राने आपला मोह पाश,
मानव समाजाचा होतोय हळूहळू सत्यानाश.
युवा पिढी करतेय भलते विडीओ बघुन अपराध,
व्हाट्सअप च्या अफवा आपसात वाढवताते वाद.
जो तो असे बीझी रीलस् वगैरे सोशल मीडियावर करण्यात शेयर,
मग कोण करणार बरे गणपती उत्सवाची केयर,
नाही राहिली कोणाला आता सामुहिक उत्सवांची गोडी,
झाली सर्व माणसे ह्या एपस् ने पूर्णपणे वेडी.
ही बातमी मांडीत बसलेल्या बाल गणेशाने पण ऐकली,
आणि आपल्या मनातल्या मनात एक युक्ती योजली.
शिकवला पाहिजे ह्या भ्रष्ट मानवा छान धडा,
अद्दल घडवाया निवडला मार्ग एक वाकडा.
आपल्या मायेने केले सर्वच एपस् मोबाईल मधुन बंद,
सर्व मनुष्यांचा जणू हिरावून घेतला आनंद.
मग सर्वांना तेथुन च एक मेसेज पाठवला,
त्रागा सोडूनी लागा माझ्या आगमनाच्या तैयारीला .
गणेशोत्सवात झाली गप्पा,गाणे, नृत्य कार्यक्रमांची
खुपच चंगळ,
कशे गेले मस्त दहा दिवस कोणाला ही नाही कळल.
निरोपाच्या दिवशी परत पाठवला देवाने एक मेसेज,
मी चालू करत आहे पुन्हा हे सगळे तुमचे एप.
पण द्या मात्र मला तुम्ही सर्व एक वचन,
कोणी आता राहणार नाही ह्यांचा गुलाम होऊन.
बरं का मंडळी आपण हे नीट घ्या समजवून ,
मोबाईलच्या छंदास्तव नका जाऊ आपली संस्कृती विसरून.
🌹🙏
सुधीर एरंडे
२२/०८/२४