बाप्पा पूर्वांचलचे – कवि श्री सुहास शरद देशपांडे

बाप्पा पूर्वांचलचे

आनंदी आनंद गडे।
बाप्पा येणार आमच्या कडे ।।

सुरवात करूयात कवी संमेलनाने।
एकमेकांच्या मनोमिलनाने।।

कशासाठी हवेत वाद।
घालूयात सगळ्यांना साद।
कारण आहे महाप्रसाद।।

या सगळे संगती।
वाढायच्या आहेत पंगती।।

किती घालायची तुम्हाला साद।
द्या की स्पर्धां ना थोडातरी प्रतिसाद ।।

रंगवूयात किर्तन।
ठेउन चांगले वर्तन।।

कळेल गंध मराठी मातीचा।
जर असेल गंध मराठीचा ।।

कशाला हवंय मी पण।
आहेना आपले आपण ।।

जर होईल एकीचं प्रदर्शन।
तरचं बाप्पा देतील दर्शन।
बाप्पा देतील दर्शन।।

सुहास शरद देशपांडे