॥ *बोबडे बोल* ॥
॥ *को जागते? को जागिरे??* ॥
पूर्ण चंद्राची झालर
अन दुधात साखर
सिमोल्ल॔घन जाहले
आता सुरू सण वार
पुढे छान रहायला
लक्ष्मी घरं बघणार्
आजपासून ती नवे
स्वच्छ घर शोधणारं
घरी येते लक्ष्मी माता
पुजूयात कोषागार
स्वच्छ करू सारवून
अडगळ नको फार
आता सुरू सण वार
परिसर सज्ज झाला
स्वच्छ झाले घर दारं
प्रकाशली दीप माळ
प्रत्येकाच्या घरावर
शरदाच्या पुनवेला
अंगणात चुलीवर
चारोळी विलायची चे
घ्या – दुध गाडगा भर
फेटू, घालूनी साखर
विसरूनी भेद भाव
चला करूया जागर
पूर्ण चंद्राची झालर
अन दुधात साखर
विसरूनी भेद भाव
चला करूया जागर
येते कोजागिरी माता
करू तिचा जयकार
॥ *बोबडे बोल* ॥©
*एक अष्टाक्षर*
@ *संदीप बोबडे*