*।। बोबडे बोल ।।©*
मुखी जपे श्रीहरी
शुभ वदे वैखरी
सुहास्य मुख कमळी
देत असे समाधान…।।
ज्याने भाव जाणिला
तोची तीरा लागिला
बाकी उकिरड्यावर
किडा मुंगी प्रमाणात…।।
कुणी म्हणे ते प्रारब्ध
कुणी जाणती साधना
गुरु बैसोनी न मिळे
थोडी घ्यावी यातना।। ।।
काय हे जीवन
काय ह्या योनी माथी…
हर एक क्षण माझा
गोरक्षा तुमच्यासाठी ।। ।।
तुम्ही म्हणाल, ते प्रमाण
तुम्ही ठेवाल, ते ठिकाणं
तुम्ही द्याल तो च श्वास
गिरिनारी मी अर्पिन ।। ।।
*।। बोबडे बोल ।।©*
*@संदीप बोबडे*